शिवडी न्हावा शेवा ट्रान्स हार्बर लिंक साठी या वेळी सुद्धा कुणीही बोली जमा केल्या नाहीत आणि प्रकल्प आता काही काळ तरी पुढे गेला हे वाचून फार बरे वाटले . याचे कारण असे की हा प्रकल्प फक्त खाजगी वाहनांना सोयीस्कर ठरणार आहे आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला यात दुर्लक्षित करण्यात आले आहे . जेव्हा या सी लिंक वर एक रेल्वे चा सुद्धा मार्ग व्हावा अशी कल्पना काही वाहतूक तज्ञांनी मंडळी तेव्हा यास सरकारकडून प्रतिसाद मिळाला नाही . आपले सरकार खाजगी वाहतुकीला प्रोत्साहन देण्यासाठी असले प्रकल्प राबविण्याचे धोरण का राबवीत आहे हेच काळात नाही . नवी मुंबई मधल्या जागांचे भाव वाढविण्यासाठी एक विमानतळाचा घोळ राजकारण्यांनी घालून ठेवलाच आहे त्यात आता हा प्रकल्प . म्हणजे दक्षिण मुंबई मधल्या धनिकांनी नवी मुंबई मध्ये मोठी घरे आणि फार्म हाऊसेस घेऊन तिकडून या सी लिंक ने अर्ध्या तासात आपल्या कार्यालयात महागड्या गाड्यान मधून सामान्य माणसांना न परवडणारा टोल भरून टेचात यावे असा हा एकंदरीत मामला दिसतो ! त्यापेक्षा शिवडी आणि न्हावा शेवा या दोन समुद्र किनार्यान दरम्यान जलवाहतुकीचा अथवा पूलच बांधायचा झाला तर रेल्व...