जेव्हा आमचे काही उच्च शिक्षित मित्र निवडणुकी विषयी चर्चा करताना , ” साले सगळेच भ्रष्ट आहेत रे “ , “ काही चांगला पर्यायच नाही “ , ” कशाला जायचे मतदाना ला .. ” , ” NOTA करूया या वेळी “ , ” आमच्या आवडीचा उमेदवार दिला नाही यार “ वगैरे वगैरे उसासे सोडतात तेव्हा खूप वाईट वाटते . ऑफिस ने फुकट इंटर नेट सुविधा दिल्यामुळे तासन तास फेसबुक वर तावा तावाने भांडणारे मतदाना बद्दल एव्हढे अनुत्साही का ? आयुष्यात सगळे काही मना सारखे होत नसते. आपल्याला कुठल्या शाळेत घालावे हे सुद्धा आपले आई वडील ठरवतात तेव्हा आपण ४-५ वर्षाचे गळक्या नाकाने हाफ चड्डी मध्ये भटकत असतो .जेव्हा कळू लागते तेव्हा फार उशीर झाला असतो आणि जरी ती शाळा किव्हा शिक्षक नाही आवडले तरी मुकाट अभ्यास करून दहावी होतो आणि मग पाहिजे ते महाविद्यालय निवडायचा प्रयत्न करतो .कॉलेज मध्ये सुद्धा कुठली मुलगी आपल्याला पटेल हे सुद्धा आपल्या हातात नसून आपल्या मित्राच्या बापा च्या ब्यांक ब्यालंस वर अवलंबून असते . त्याचा बाप श्रीमंत असेल तर तुमचा नंबर लागणे कठीण असते .नोकरी साठी मुलाखत देताना सुद्धा मुला...