Skip to main content

Posts

Showing posts from February, 2015

जागतिक मराठी दिना निमित्त मुक्त चिंतन ..आपण मराठी आहोत का ?

आज जागतिक मराठी भाषा दिन.सकाळ पासून "लाभले आम्हास भाग्य" वगैरे मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा देणारे मेसेजेस whatsapp आणि फेसबुक वर थडकु लागलेयत.आनंद आहे की लोकांना निदान आठवण आहे .पण वर्षा तुन एकदा असले मेसेज फॉरवर्ड करण्या पलीकडे आपण नक्की मराठी भाषा जिवंत रहावी म्हणून काय करतो ?   ऑफिस मध्ये जरी आधिकारिक भाषा इंग्रजी असली तरी वैयक्तिक रित्या किती जण आपल्या मराठी सहकार्यांशी ठरवून मराठी मध्ये बोलतात ?भेसळ युक्त हिंदी आणि इंग्रजी कशाला बोलतात ?जर आपण गप्पा मारत बसलो असू आणि एखाद ... ा अमराठी सहकारी असेल तिकडे तर त्याला पण सम्भाषणा मध्ये सहभागी करून घेण्यासाठी हिंदी अथवा इंग्रजी मध्ये सर्वांनी बोलणे एक वेळ समजू शकते पण चार मराठी माणसे डबा खाताना किव्वा ऑफिस खाली चहा सिगरेट पिताना पण एकमेकांशी मराठी का बोलत नाहीत ?लाज वाटते की "लो क्लास " वाटते ?     तेच घरात.एक तर आपण सर्व मेंढरा सारखे हल्ली आपल्या मुलांना ( हो हो अगदी मी सुद्धा ) इंग्रजी शाळां मध्ये घालतो.शाळेत बिचारी मुले इंग्रजी बोलतात .मग घरी तरी त्यांच्या शी मराठी मध्ये बोला की !पण नाही !मला अशी बर...