पूर्वप्रसिद्धी : लोकसत्ता : ४ मार्च २०१८ : https://www.loksatta.com/vishesh-news/what-is-nanotechnology-1639796/ आधुनिक युगातील भारतीय " फॅरेडे " : डॉ.कौस्तव बॅनर्जी आजचे जग तंत्रयुग म्हणून ओळखले जाते. मोबाईल फोन , लॅपटॉप, रेडियो, टेलीव्हिजन, कार इत्यादी वस्तू ज्या काही वर्षांपूर्वी श्रीमंती समजल्या जायच्या त्या आज सहज मध्यमवर्गीय आणि काही प्रमाणात निम्न मध्यमवर्गीय घरांमध्ये सर्रास दिसतात . दिवसेंदिवस तंत्रज्ञानात प्रगती होतेय पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे या सर्व आधुनिक तंत्रज्ञानाचे मूलभूत घटक असलेले विद्युत प्रवर्तक ( Inductor ) मात्र अजूनही दीडशेहून जास्त जुन्या काळातील तत्वावर चालतात ! विख्यात ब्रिटिश शास्त्रज्ञ मायकेल फॅरेडे यांनी १८३१ साली केलेल्या संशोधनावरून आजही विद्युत प्रवर्तक तयार केले होते. आपण शाळेत असताना विज्ञानातील विद्युतशास्त्रात जे ‘फॅरेडेचे नियम’ शिकलो तोच हा विश्वविख्यात भौतिक शास्त्रज्ञ मायकेल फॅरेडे प्रथम आपण विद्युत प्रवर्तक म्हणजे काय ते समजून घेऊ . हा व्होल्टेज दिल्यावर ( विद्युत प्रवाह सोडल्यावर ) गोलाकार कॉ...