आमची उन्हाळ्याची सुट्टी ! आज ट्रेन मध्ये दोस्तान बरोबर गप्पा मारताना आमच्या लहानपणी ची उन्हाळ्याची सुट्टी आणि सध्याची मुले आपली सुट्टी कशी घालवतात याचा विषय निघाला होता .आणि गप्पा मारता मारता मन २०-२५ वर्षे मागे गेले ! सुट्टी लागताच पहिला कार्यक्रम व्हायचा म्हणजे चिमाजी अप्पा ग्राउंड समोर च्या गाडी वरचा बर्फाचा गोळा आणि लिंबू सरबत ! सागर पाटील आमचा लीडर .त्यात सुद्धा गोळ्या वरचा रंग सुर्र सुर्र करून पिऊन “भैय्या और कलर डालो “ असे म्हणून पैसा वसूल करणे हे तर नित्याचेच ! १ रुपया मध्ये गोळा ,५० पैसे संजू चा वडा पाव आणि १ रुपया मध्ये लिंबू सरबत ! आज हे सगळे खरे वाटत नाही ! त्या नंतर बेत ठरायचा तो रोज सकाळी ७ वाजता उठून सुरुच्या बागेत समुद्र किनार्यावर क्रिकेट खेळण्याचा . त्या वेळी समुद्रा वर जायला रस्ता नव्हता ..मध्ये चिखला च्या खोच्या होत्या पण सगळी पोरे मस्त चिखलात बरबटून जायची आणि क्रिकेट खेळायची .अभिजित राव ,सचिन खांडेकर ,संकेत पाटील ,शंतनू ,नानू ,अक्षय ,आदित्य सामंत ही लोकल ग्यांग समुद्र क्रिकेट मेम्बर्स !क्रिकेट खेळून दमले की मस्त वाळू मध्ये आडवे पडून गप्पा...