Skip to main content

Posts

Showing posts from 2018

उत्तम आणि समाधानकारक करियर कसे निवडाल ?

नमस्कार मित्रांनो . उत्तम आणि समाधानकारक करियर कसे निवडावे याबद्दल थोडी मांडणी करण्याचा हा माझा छोटासा प्रयत्न :-) जर तुम्ही हा लेख अशा अपेक्षेने वाचायला   सुरुवात केली असेल की मी तुम्हाला आज हमखास नोकरी आणि पैसे देणार करिअर क्षेत्र सांगणार आहे आणि तुमच्या मुलांना अमुक-तमुक कोर्स केला की गलेलठ्ठ पगाराची नोकरी लागेल याचे मार्गदर्शन करणार आहे तर कृपया हा लेख वाचणं आताच बंद करा :-) आपण या लेखांमध्ये आज करियर निवडताना मुलांनी आणि पालकांनी नक्की कसला विचार केला पाहिजे याबद्दल चर्चा करणार आहोत आणि बऱ्याच पालकांना कदाचित ते आवडणार सुद्धा नाही . मला असे अनुभव आहेत की त्यांच्या दहावी किंवा बारावी झालेल्या मुलाला अथवा मुलीला पालकांनी माझ्याकडे आणलं आणि त्यांची अपेक्षा अशी होती की मी त्यांना इंजिनीअरिंग किव्वा आय टी क्षेत्रातील करियर कसे चांगले हे सांगून  इंजिनीअरिंगचा कोर्स करायला सांगेन . पण त्यांचा भ्रमनिरास झाला आणि मी मात्र केवळ त्या विद्यार्थ्याला लॉजिकली विचार कसा करायचा हे शिकवायचा प्रयत्न केला जेव्हा पालक त्यांच्या मुलां...

आधुनिक युगातील भारतीय "फॅरेडे" : डॉ.कौस्तव बॅनर्जी

पूर्वप्रसिद्धी : लोकसत्ता : ४ मार्च २०१८ :  https://www.loksatta.com/vishesh-news/what-is-nanotechnology-1639796/  आधुनिक युगातील भारतीय " फॅरेडे " : डॉ.कौस्तव बॅनर्जी आजचे जग तंत्रयुग म्हणून ओळखले जाते. मोबाईल फोन , लॅपटॉप, रेडियो, टेलीव्हिजन, कार इत्यादी वस्तू ज्या काही वर्षांपूर्वी श्रीमंती समजल्या जायच्या त्या आज सहज मध्यमवर्गीय आणि काही प्रमाणात निम्न मध्यमवर्गीय घरांमध्ये सर्रास दिसतात . दिवसेंदिवस तंत्रज्ञानात प्रगती होतेय पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे या सर्व आधुनिक तंत्रज्ञानाचे मूलभूत घटक असलेले विद्युत प्रवर्तक ( Inductor )  मात्र अजूनही दीडशेहून जास्त जुन्या काळातील तत्वावर चालतात ! विख्यात ब्रिटिश शास्त्रज्ञ मायकेल फॅरेडे यांनी १८३१ साली केलेल्या संशोधनावरून आजही विद्युत प्रवर्तक  तयार केले होते. आपण शाळेत असताना विज्ञानातील विद्युतशास्त्रात जे ‘फॅरेडेचे नियम’ शिकलो तोच हा  विश्वविख्यात भौतिक शास्त्रज्ञ मायकेल फॅरेडे प्रथम आपण विद्युत प्रवर्तक  म्हणजे काय ते समजून घेऊ . हा व्होल्टेज दिल्यावर ( विद्युत प्रवाह सोडल्यावर ) गोलाकार कॉ...