नमस्कार मित्रांनो . उत्तम आणि समाधानकारक करियर कसे निवडावे याबद्दल थोडी मांडणी करण्याचा हा माझा छोटासा प्रयत्न :-) जर तुम्ही हा लेख अशा अपेक्षेने वाचायला सुरुवात केली असेल की मी तुम्हाला आज हमखास नोकरी आणि पैसे देणार करिअर क्षेत्र सांगणार आहे आणि तुमच्या मुलांना अमुक-तमुक कोर्स केला की गलेलठ्ठ पगाराची नोकरी लागेल याचे मार्गदर्शन करणार आहे तर कृपया हा लेख वाचणं आताच बंद करा :-) आपण या लेखांमध्ये आज करियर निवडताना मुलांनी आणि पालकांनी नक्की कसला विचार केला पाहिजे याबद्दल चर्चा करणार आहोत आणि बऱ्याच पालकांना कदाचित ते आवडणार सुद्धा नाही . मला असे अनुभव आहेत की त्यांच्या दहावी किंवा बारावी झालेल्या मुलाला अथवा मुलीला पालकांनी माझ्याकडे आणलं आणि त्यांची अपेक्षा अशी होती की मी त्यांना इंजिनीअरिंग किव्वा आय टी क्षेत्रातील करियर कसे चांगले हे सांगून इंजिनीअरिंगचा कोर्स करायला सांगेन . पण त्यांचा भ्रमनिरास झाला आणि मी मात्र केवळ त्या विद्यार्थ्याला लॉजिकली विचार कसा करायचा हे शिकवायचा प्रयत्न केला जेव्हा पालक त्यांच्या मुलां...