Skip to main content

Posts

Showing posts from July, 2017

मराठी माणसाला काय येत नाही !!

मराठी भाषा दिन अथवा महाराष्ट्र दिन असला की काही टिपिकल मेसेजेस व्हाट्सअप वर फिरू लागतात.त्यातलाच एक मेसेज म्हणजे "मराठी माणसाला काय येते " ! थोर व्यक्तींची नावे घेऊन ,मराठी माणसाला हिंदवी स्वराज्य स्थापन करता येते / राज्यघटना लिहिता येते /मराठी माणसाला भारतीय असंतोषाचे जनक होता येते / मराठी महिलेला राष्ट्र्पती होता येते /मराठी क्रिकेटपटू विश्वविक्रमवीर होतो /मराठी माणसाला अमुक येते आणि तमुक येते ..वगैरे वगैरे लिहून "अभिमान आहे मराठी असल्याचा" ची फुशारकी मारली जाते .हे जे कोणी "थोर" असतात ते फक्त  "मराठी" म्हणून नव्हे तर आपल्या अंगभूत गुणांनी आणि परिश्रमाने मोठे झालेले असतात . पण आपण मात्र त्यांना फक्त "मराठी" लेबल चिकटवून फुशारक्या मारतो .  ठीकाय ...आपल्या भाषेचा /राज्याचा /संस्कृतीचा /थोर महापुरुषांच्या कार्याचा अभिमान असणे यात वाईट काहीच नाही . पण हे सर्व करताना आजचा मराठी समाज कसा आहे याचे आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे केवळ आपल्या गौरवशाली इतिहासाच्या रम्य कथांमध्ये रमणाऱ्या  आणि आपल्या वर्तमानाकडे दुर्लक्ष करणाऱ्या ...

"करोड रुपयांच्या सॅलरी पॅकेजेस " चे सत्य !!

  पूर्वप्रसिद्धी :  लोकसत्ता : लोकरंग पुरवणी : १६ -०७-२०१७ (  http://www.loksatta.com/lekha-news/article-show-truth-about-highest-salary-package-in-multinational-companies-1512435/ )  आय आय टी आणि आय आय एम च्या कॅम्पस इंटरव्ह्यू मधून तिकडच्या विद्यार्थ्यांना अमेरिकेत काही कम्पन्यांकडून "ऑफर " झालेल्या गलेलठ्ठ  पगाराच्या च्या बातम्या आपण सर्वानीच वाचल्या असतील .आपल्या वर्तमानपत्रांना सुद्धा अश्या बातम्यांना मीठ-मसाला लावून देण्यात मज्जा वाटते ."२२ वर्षाच्या इंजिनियरला मायक्रोसॉफ्ट/उबर /गुगल /अमक्या तमक्या कम्पनीची सव्वा कोटी वार्षिक पगाराची ऑफर " /"आय आय एम अहमदाबाद च्या मुलीला न्यू यॉर्क मध्ये दीड कोटीचे पॅकेज " अश्या बातम्या हल्ली नित्याच्या झाल्या आहेत . अमेरिकन डॉलर मध्ये असलेल्या पॅकेज ला खूप सुलभपणे ७० ने गुणून भारतीय रुपयात डोळे विस्फारणारे आकडे छापून "सनसनी " निर्माण करणे हा मीडिया चा आवडता धंदा आहे . म्हणून आपण या लेखात आज या सर्व प्रकारचे सत्य समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत .   ( फोटो : टाइम्स ऑफ इंडिया च्या पब्लिक व...

Banks Can Not Refuse to Accept Scribbled Currency Notes

महत्वाचे : ५०० आणि २००० च्या ज्या नोटांवर काही लिहिले आहे /रंग गेलेला आहे / नोटा चुरगळलेल्या आहेत त्या नोटा सुदधा चलनात आहेत आणि बँका त्या नोटा नाकारू शकत नाहीत . सध्या बऱ्याच ठिकाणी नोटांवर काही लिहिले असेल तर अश्या नोटा दुकानदार स्वीकारत नाहीत. काही बँका सुध्दा अगदी चुकून नवीन २००० आणि ५०० च्या नोटांवर एखादा शाईचा डाग अथवा पेनाने काही मार्क नोटेवर असेल तर अश्या नोटा घ्यायला नकार देत आहेत . याबाबत एकूणच गोंधळ दिसतो आणि म्हणून ही महत्त्वाची माहिती लिहावीशी वाटली : १. RBI ने ३१ डिसेम्बर २०१३ रोजी  २०१३-१४/१३११ या क्रमांकाचा एक प्रेस रिलीज देऊन त्यात नागरिक आणि बँक अधिकारी यांना नोटांवर काहीही न लिहिण्याचे आवाहन केले होते . हे RBI च्या "क्लीन नोट पॉलिसी" अंतर्गत होते . नोटांवर काही बाही लिहून त्या खराब होतात आणि त्यामुळे कृपया नोटांवर काही लिहू नका असे सांगण्यात आले होते. परंतु लिहिलेल्या नोटा वैध चलन नाहीत असे कुठेही म्हटले नाहीये . २.याच "क्लीन नोट पॉलिसी" अंतर्गत २००२ पासून RBI  ने  बँकेच्या कर्मचाऱ्यांना नोटांची बंडले स्टेपल क...