What we can learn from Bhutan (Marathi )
भूतान चे पर्यावरण प्रेम आणि त्या पासून आपण काय शिकू शकतो ?
हल्लीच आमचे स्नेही डॉ नंदकुमार राऊत आणि त्यांची सुविद्य पत्नी ऋजुता ताई यांच्याशी सहज गप्पा मारताना भूतान या आपल्या छोट्याश्या शेजारी देशा चा विषय निघाला
राऊत दाम्पत्य त्यांचे भूतान मधले पर्यटना चे अनुभव सांगताना तिकडे पर्यावरणाची कशी जपणूक केली जाते हे सुद्धा सांगत होते .भूतान बद्दल मी सुद्धा बऱ्याच गोष्टी ऐकून होतोच .आपल्या देशाची प्रगती इतरांसारखी जी डी पी मध्ये न मोजता जी एन पी म्हणजे (ग्रॉस नॅशनल हॅप्पी नेस ) या अनोख्या एककात मोजणारा हा अनोखा देश या पृथ्वी वरचा एकमेव कारबन निगेटिव्ह देश सुद्धा आहे .म्हणजे सर्व जग ग्लोबल वॉर्मिंग च्या नावाने बोंबलत असताना भूतान मधली वने भूतान मध्ये निर्माण होणाऱ्या कारबन डाय ऑक्सआईड पूर्ण शोषून घेऊन त्या पेक्षा जास्त ऑक्सिजन वातावरणात सोडतात .भूतान चा ६०% भूभाग सदैव वनक्षेत्र राहील असे वचन भूतान ने जगाला दिलेले आहे .
सम्पूर्ण जगात बेसुमार वृक्षतोड होत असताना भूतान हे सर्व कस काय साध्य करू शकत असेल ?तर उत्तर सोपे आहे .भूतान च्या लोकशाही प्रेमी राजापासून ते अगदी शाळेतील लहान मुला पर्यंत सर्वजण निसर्गावर मनापासून प्रेम करतात .भूतान मध्ये लहान वयात शाळे पासूनच वृक्ष संवर्धनासाठी संस्कार केले जातात .
भूतान मधल्या शाळा एक अतिशय सुंदर उपक्रम राबवितात .प्रत्येक मूल जेव्हा शाळेत पहिली मध्ये प्रवेश घेते तेव्हा त्याचे स्वागत त्याच्या हस्ते शाळेच्या आवारात अथवा आस पासच्या जागेत एक झाड लावून करण्यात येते!आणि त्या विद्यार्थाने पुढची दहा वर्षे त्या झाडाला पाणी घालून त्या झाडाला वाढवायचे असते . या सुंदर रूढी मूळे प्रत्येक झाडाला एक विद्यार्थी मित्र आणि सखा/सखी मिळते जी त्या झाडाची शाळेत असे पर्यंत जीवा पाड काळजी घेते .एकदा एखादे झाड दहा वर्ष जगले,मोठे झाले की नंतर ते आपोआप जगते .
भारता सारख्या मोठया लोकसंखे च्या देशात विद्यार्थी आणि शाळेत असलेली जागा याचे गुणोत्तर व्यस्त असल्याने अगदी ही कल्पना प्रत्येक विद्यार्थ्या साठी जशी त्या तशी राबविणे शक्य नसले तरी किमान प्रत्येक पहिलीच्या वर्गाकडून /तुकडी कडून एक झाड लावून घेऊन त्या झाडाला १० वर्ष ,ती तुकडी SSC होई पर्यंत सांभाळायला दिले तर ?महाराष्ट्रा मध्ये हजारो शाळा आहेत आणि प्रत्येक वर्षी प्रत्येक शाळेत किमान २ ते कमाल ५ अशी जरी झाडे पहिली च्या वर्गाने दर वर्षी लावून त्यांचे संगोपन केले तर आपला महाराष्ट येत्या ५ वर्षात हिरवा गार होईल .मुलांना सुद्धा लहान वयात पर्यावरणाची गोडी लागेल आणि एका पिढी वर सुंदर संस्कार होतील .शाळेत जागा नसेल तर नजीकच्या बागेत /मैदानात/टेकडी वर सुद्धा हा प्रयोग करवून घेता येईल .
पुढच्या आठवड्यात १५ जून रोजी महाराष्ट्रा मध्ये शाळा सुरु होत आहेत ,तेव्हा कृपया हा मेसेज सर्व मित्रांपर्यंत प्रसारित करा .किमान १०% शाळां पर्यंत आणि शिक्षकां पर्यंत जरी ही संकल्पना पोहोचून काहींनी जरी या अनोख्या प्रयोगाला याच वर्षी सुरुवात केली तरी चांगली सुरुवात होईल .चला तर मग ,यंदा पहिली च्या चिमण्या विद्यार्थ्यांचे स्वागत त्यांच्या हस्ते एक झाड लावून करूया
धन्यवाद
चिन्मय गवाणकर
सचिव-न्यू इंग्लिश स्कुल माजी विद्यार्थी महासंघ-वसई, माजी सचिव -जागरूक नागरिक संस्था वसई