सध्या राज्यात पावसामुळे रस्ते खड्डेमय झाल्याचे दिसत आहे . आणि चक्क मा . उच्च न्यायालयाला या विषयाची दखल घावी लागली आहे . कंत्राटदार , राजकारणी आणि प्रशासन यांच्या भ्रष्टाचाराची आणि कंत्राटदारांनी केलेल्या निकृष्ट "रस्ते बांधणी" ची भरपूर चर्चा सध्या माध्यमान मध्ये होत आहे .तरी सुद्धा या सर्व चर्चेत बहुतांश माध्यमांचे एका मुद्द्या कडे दुर्लक्ष झालेले दिसते .तो म्हणजे मुळा त किती रस्ते खरोखर "बांधले " जातात ? हल्ली रस्ते " बांधणे " म्हणजे आधी अस्तित्वात असलेल्या खड्डेमय रस्त्यावर चक चकित डांबर टाकून रोलर फिरविणे असा अर्थ घेतला जातो !त्यामुळे वरून टाकलेला हा डांबराचा थर खाली काहीच पकडून ठेवणारा पाया नसल्याने पहिल्याच पावसात जातो आणि पुन्हा खड्डे पडतात. तसेच प्रत्येक वर्षी असे थर वरून टाकले जाऊन रस्त्याची उंची वाढते आणि मग बाजूच्या वस्तीपेक्षा रस्ता उंच होऊन बाजूला पाणी जमणे , बाजूची साईड पट्टी खचणे वगैरे बाकीच्या समस्या निर्माण होतात . त्यामुळे मुद्दाम लक्ष देऊन सध्या पडलेले खड्डे पहा . खड्ड्याच्या खाली सुद्धा एक जुना डांबराचा थर सापडेल ! ...