The Gavankars

Friday, April 11, 2014

Why everyone should vote and not use NOTA !(Marathi )



जेव्हा आमचे काही  उच्च शिक्षित मित्र निवडणुकी विषयी चर्चा करताना ,साले सगळेच भ्रष्ट आहेत रे , काही चांगला पर्यायच नाही ,कशाला जायचे मतदाना ला .. , NOTA करूया या वेळी , आमच्या आवडीचा उमेदवार दिला नाही यार वगैरे वगैरे उसासे सोडतात तेव्हा खूप वाईट वाटते . ऑफिस ने फुकट इंटर नेट सुविधा दिल्यामुळे तासन तास फेसबुक वर तावा तावाने भांडणारे मतदाना बद्दल एव्हढे अनुत्साही का ? आयुष्यात सगळे काही मना सारखे होत नसते. आपल्याला कुठल्या शाळेत घालावे हे सुद्धा आपले आई वडील ठरवतात तेव्हा आपण ४-५ वर्षाचे गळक्या नाकाने  हाफ  चड्डी मध्ये भटकत असतो .जेव्हा कळू लागते तेव्हा फार उशीर झाला असतो आणि जरी ती शाळा किव्हा शिक्षक नाही आवडले  तरी मुकाट अभ्यास करून दहावी होतो आणि मग पाहिजे ते महाविद्यालय निवडायचा प्रयत्न करतो .कॉलेज मध्ये सुद्धा कुठली मुलगी आपल्याला पटेल  हे सुद्धा  आपल्या हातात नसून आपल्या मित्राच्या बापा च्या ब्यांक ब्यालंस वर अवलंबून असते . त्याचा बाप श्रीमंत असेल तर तुमचा नंबर लागणे कठीण असते .नोकरी साठी मुलाखत देताना सुद्धा मुलाखत घेणाऱ्या माणसाचे सकाळी बायकोशी भांडण झाले/गाडीचा टायर पंक्चर झाला /आज  बायकोने  बटाट्याची भाजी डब्यात दिली ती त्याला आवडत नाही /तुमची ट्रेन लेट झाली वगैरे वगैरे मुद्दे नोकरी मिळणार कि नाही यात खूप मोठी भूमिका बजावतात . पुढे लग्नाबद्दल तर काही बोलायलाच नको.

तर मुद्दा हा आहे की विविध राष्ट्रीय पक्ष जे उमेदवार देतात त्यावर आपले मत काय हे आपण ५ वर्षान तून  फक्त एकदा  मतपेटी मधून दाखवू शकतो आणि त्यासाठी मतदान केंद्रा पर्यंत जाऊन कोणाला तरी मत द्यावे लागते . पण त्यातही तुम्ही कोणाला मत दिले यापेक्षा बाकीचे मतदार कोणाला मत देतात यावरून बहुमता चा विजयी उमेदवार ठरतो .सध्या फेसबुक वर फ्याशन मध्ये असलेला NOTA करून काही फायदा नाही कारण जरी ९९ % लोकांनी NOTA बटन दाबले तरी उरलेल्या १ % मध्ये जी मते मिळतील त्या मधून उमेदवार ठरणार . मग तुम्ही NOTA दाबून काय पराक्रम केला ? तुम्हाला असे वाटते कि बिलंदर राजकारणी तुमच्या संतापाची दखल घेऊन पुढच्या वेळी चांगले उमेदवार देतील ? अरे मूर्ख आहात . उलट त्यांचे काम सोपे होईल . निवडून आपल्यावर काम करताना किव्वा पुढच्या निवडणुकीचा प्रचार करताना ज्यांनी वैध मत दिले त्याच  १ % लोकांना फक्त पटवावे लागेल त्यांना आणि तुमचा उपयोग शून्य होईल .तुम्ही मतच देणार नाही म्हटले की तुमचे काम तरी ते का करतील ?

म्हणून येत्या निवडणुकी मध्ये उपलब्ध पर्याया मधून त्यातल्या त्यात बरा उमेदवार निवडा,त्या साठी स्थानिक/भावनिक/धार्मिक/जातीय/प्रांतीय वगैरे विचार न करता सर्व उपलब्ध जाहीरनामे वाचा,विचार करा आणि ठरवा . आपण खासदाराला मत देतोय तर तो दिल्ली मध्ये जाऊन आपल्या राष्ट्रीय विकासा साठी काय योगदान देणार याचा विचार करा . गल्ली मधल्या गटारा च्या बाजूला साहेबांनी खासदार निधी मधून पैसे देऊन पेव्हर ब्लॉक लावले/ट्रेन तिकीट काढायला लेटर हेड वर पत्र दिले वगैरे .. हे खासदारकी साठी मतदाना चे मुद्दे होऊ शकत नाहीत .म्हणून आवडत नसेल तरी मतदान करा ,NOTA करून किव्वा मतदाना च्या दिवशी पिकनिक ला जाऊन आपल्या मताची किंमत कमी करू नका  ..कारण आयुष्यात सगळे काही मनासारखे होत नसते.. किमान सरकार तरी मनासारखे आणायचा प्रयत्न करा !  

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home