Banks Can Not Refuse to Accept Scribbled Currency Notes
महत्वाचे : ५०० आणि २००० च्या ज्या नोटांवर काही लिहिले आहे /रंग गेलेला आहे / नोटा चुरगळलेल्या आहेत त्या नोटा सुदधा चलनात आहेत आणि बँका त्या नोटा नाकारू शकत नाहीत .
सध्या बऱ्याच ठिकाणी नोटांवर काही लिहिले असेल तर अश्या नोटा दुकानदार स्वीकारत नाहीत. काही बँका सुध्दा अगदी चुकून नवीन २००० आणि ५०० च्या नोटांवर एखादा शाईचा डाग अथवा पेनाने काही मार्क नोटेवर असेल तर अश्या नोटा घ्यायला नकार देत आहेत .
याबाबत एकूणच गोंधळ दिसतो आणि म्हणून ही महत्त्वाची माहिती लिहावीशी वाटली :
१. RBI ने ३१ डिसेम्बर २०१३ रोजी २०१३-१४/१३११ या क्रमांकाचा एक प्रेस रिलीज देऊन त्यात नागरिक आणि बँक अधिकारी यांना नोटांवर काहीही न लिहिण्याचे आवाहन केले होते . हे RBI च्या "क्लीन नोट पॉलिसी" अंतर्गत होते . नोटांवर काही बाही लिहून त्या खराब होतात आणि त्यामुळे कृपया नोटांवर काही लिहू नका असे सांगण्यात आले होते.परंतु लिहिलेल्या नोटा वैध चलन नाहीत असे कुठेही म्हटले नाहीये .
२.याच "क्लीन नोट पॉलिसी" अंतर्गत २००२ पासून RBI ने बँकेच्या कर्मचाऱ्यांना नोटांची बंडले स्टेपल करू नका असे सांगितले होते .
३.परंतु "नोटांवर" लिहू नका असे म्हटले म्हणजे "नोटा घेऊच नका" असा सोयीस्कर अर्थ लावून काही बँकांनी प्रथम अश्या नोटा घेण्यास नकार देण्यास सुरुवात केली .
४. RBI ने मात्र दिनांक २५ एप्रिल २०१७ रोजी एक विशेष सर्क्युलर काढून नोटांवर काहीही लिहिले असले /नोटांचा रंग गेला असला इत्यादी काहीही असले तरी ५०० आणि २००० च्या नव्या नोटा बँकांनी स्वीकारणे बन्धनकारक आहे असे स्पष्टपणे म्हटले आहे . या सर्क्युलर चा सन्दर्भ क्रमांक आहे ४५३०/०४.०००.००१/२०१६-१७ ज्याची प्रत जोडत आहे .
तरी कृपया या सर्क्युलर चा नम्बर नोट करा आणि कुठल्याही बँकेने /संस्थेने आपल्या नोटा घ्यायला नकार दिला तर आपल्या जिल्हा अग्रणी बँकेच्या व्यवस्थापकांशी अथवा RBI च्या महाराष्ट्र -गोवा क्षेत्रीय बँकिंग लोकपाला कडे कडे तक्रार करू शकता . त्यांचा सम्पर्काचा पत्ता खालीलप्रमाणे :
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ,भायखळा ऑफिस ,मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशन च्या समोर ,भायखळा ,
मुंबई-४०० ००८ ,फोन : ०२२-२३०२२०२८,ईमेल : bomumbai@rbi.org.in
आपल्या जिल्ह्याच्या अग्रणी बँकेचा सम्पर्क क्रमांक आणि पत्ता खालील वेबसाईट वर मिळू शकेल : ( स्टेट : महाराष्ट्र असे टाईप करून सर्च बटन दाबा )
पालघर जिल्ह्यासाठी आपल्या जिल्हा अग्रणी बँकेचे ( बँक ऑफ महाराष्ट्र ) व्यवस्थापक श्री अनिल सावंत साहेब यांच्याकडे ०२५२५-२९७४७४ या क्रमांका वर तक्रार करू शकता . नागरिक/दुकानदार यांनी सुद्धा न घाबरता चुकून काही लिहिलेल्या/डाग असलेल्या नोटा कोणी दिल्याच तर त्या स्वीकाराव्या कारण त्या वैध चलन आहेत .अश्या नोटा तुम्ही बिनधास्त बँकेत भरू शकता .परंतु एकूणच आपल्या देशाच्या चलनाचा मान राखण्यासाठी कृपया नोटांवर काही लिहू नका अशी नम्र विंनती .
कृपया ही माहिती सर्व महाराष्ट्र भर पाठवा आणि नागरिकांना या महत्वाच्या विषयाची माहिती करून द्या .कृपया या ब्लॉगच्या लिंक सकट आणि लेखकाच्या नावाने मेसेज फॉरवर्ड केल्यास उत्तम :-)
धन्यवाद
चिन्मय गवाणकर ,वसई
Chinmay.Gavankar@Gmail.com
1 Comments:
Chinmay,
Nice initiative and informative too!
Roger Rodrigues
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home